ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
शिवाजीराव पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता ,चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार
![KAGAL KOLHPAUR](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/SHIVAJI-RAO-PATIL-KOLHAPUR-780x470.jpg)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हयातील भाजपचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला लागला असल्याची चर्चा होत आहे. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे. शिवाजीराव पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कागलमधून समरजीत घाटगे यापूर्वीच पवारांच्या पक्षात आले आहेत. आता चंदगडमधून शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.