Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार यापुढे निवडणूक लढणार नाहीत, नेमकं कारण काय?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या वयावर टीका करत आहेत. अजित पवारांच्या या टीकेनंतर शरद पवारांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे आता शरद पवार निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलताना सांगितले आहे की, माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलं आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळे मी तोपर्यंत काम करत राहणार आहे.

हेही वाचा   –    चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’

मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करु नको का? माझ्या वयावर सातत्यानं बोललं जाते. मी १९६७ पासून राजकारणात आहे . माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथं मी काम करत राहणार आहे, असे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button