Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवार आमचेच नेते, पक्षात फूट नाही’; शरद पवारांचे सूचक विधान

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी करत सत्ताधारी पक्षाला पाठिंबा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं बोललं जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही, असं म्हटलं आहे. यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

शरद पवार म्हणाले, अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – Chess World Cup Final 2023 : बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आर. प्रज्ञानंदचा पराभव 

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्याला फूट म्हणता येणार नाही. त्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली असून, त्यावरील उत्तर अद्याप प्रलंबित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button