आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील मंत्र्याची गुप्त भेट? राजकीय चर्चांना उधाण

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरे आणि शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या भेटीमुळे शिंदे गटातील नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार का? अशी चर्चा सुरू आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यानंतर भाजप आणि शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. असं असताना आज आदित्य ठाकरे यांची दादा भुसे यांनी भेट घेतल्याने राजकिय चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा – ‘..म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; प्रिया बेर्डेंनी सांगितलं राष्ट्रवाद सोडण्याचं कारण
आदित्य ठाकरेंच्या भेटीचं दादा भूसेंचं खंडन
मी या क्षणाला सुद्धा तुम्हाला माझं लोकेशन पाठवलं आहे. नाशिकमध्यल्या हॉटेलमध्ये आम्ही आमच्या नातीचा पहिला वाढदिवस साजरा करतोय. मालेगावला लहान मुलांच्या उपस्थितीत नातीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आम्हाला करायचा होता. पण पाऊस नसल्यामुळे पीकं करपायला लागली आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंबापुरता वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं, असं मंत्री दादा भूसे यांनी म्हटलं आहे.





