Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा असणार? संजय राऊत म्हणाले..

नवी दिल्ली : भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला ‘इंडिया’ असं नाव देण्यात आलं आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. महाराष्ट्र हे एक मोठं राज्य असून लोकसभेत महाराष्ट्राच्या एकूण ४८ जागा असल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. याबाबत, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतील का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत आधी मोठ्याने हसले आणि म्हणाले, उद्धव ठाकरे हा एक हिंदुत्ववादी चेहरा आहे, राष्ट्रवादी चेहरा आहे. इंडिया आघाडीची मान्यता मिळेल तो नेता पंतप्रधानपदाचा चेहरा होईल. याबाबत आघाडीची अद्याप बैठक झालेली नाही. आम्ही बैठकीबाहेर असं कोणतंही वक्तव्य करणार नाही ज्यामुळे आमच्या आघाडीत कुठलाही मतभेद निर्माण होईल.

हेही वाचा  –  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा! म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर..

ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, त्यांची इच्छा असेल तर त्यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल. ‘इंडिया’ ही एक सर्वांनी मिळून बनवलेली आघाडी आहे. इथे हुकूमशाही चालत नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात एनडीएतही असंच काम केलं जायचं. मी आताच्या एनडीएबद्दल बोलत नाही. कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदासाठी आघाडीचं नेतृत्व करायचं असेल तर त्यावर चर्चा होईल. हे सत्य आहे की इंडिया आघाडीचा एक चेहरा असायला हवा. त्यात काहीच चुकीचं नाही. आघाडीची पुढची बैठक होईल तेव्हा या विषयावर चर्चा केली जाईल, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button