Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘..तर २४ तासांत मोदी, शाह आणि फडणवीस शिवसेनेत येतील’; संजय राऊत यांचं विधान

मुंबई : शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीने वरळीत शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची जोददार चर्चा सुरू आहे. उद्या आमच्या हातात सरकार येऊद्या २४ तासांत मोदी, शाह आणि फडणवीस शिवसेनेत येतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तान तीन ए चालवतात. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका. आपला देश सुद्ध अशी तीन लोक चालवतात. सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग. मोदी वगैरे सर्व झूट आहे. उद्या आमच्या हातात सरकार येऊद्या २४ तासांत मोदी, शाह, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील. मग आम्ही सकाळी बातमी वाचणार..ईडीच्या भीतीने फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश. पण, घ्यायचं का नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील.

हेही वाचा – ‘क्टार्टरच्या किंमती एवढे पैसे एक लिटर दुधाला द्या’; सदाभाऊ खोत यांची अजब मागणी

आमची राष्ट्रीय स्तरावर ओळख शिवसेना या चार अक्षरामुळे आहे. डुप्लिकेट नाहीतर खऱ्या शिवसेनेमुळे आहे. आपण एका युद्धात उतरलो आहोत. युद्धात नेहमी छातीवर वार झेलणारे शिवसैनिक आपण आहोत. हा महाराष्ट्र आपल्या ताब्यात ठेवू. २०२४ साली देश सुद्धा आपल्याला ताब्यात घ्यायचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button