‘शिवसेना नसती तर अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती’; संजय राऊतांचं विधान चर्चेत

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन पार पडतंय. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. शिवसेनेचे वाघ तिकडे पोहोचले. म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जाऊन प्राण प्रतिष्ठापना करता आली. लोक म्हणतात, रामाशी आमचं नातं नाही. जिथे हे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे. कुरूक्षेत्र आहे, कारण इथून आपण लढाई सुरू केली होती. आम्ही काय कुणाचे खातो, जे आम्हाला देतो. हे धर्मक्षेत्र आहे. लढाई आपण कुरूक्षेत्रातून सुरू करणार आहोत.
हेही वाचा – मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरवात! तब्बल अडीच कोटी कुटुंबाचे होणार सर्वेक्षण
जो राम अयोध्येतला आहे, तोच राम पंचवटीतील आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकची निवड केली त्याला फार महत्व आहे. रामाचे धैर्य आहे ते शिवसेनेचे धैर्य आहे. रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरे यांचा संयम आहे. धैर्य आमच्याकडे नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी पाडली नसती. भाजपकडे धैर्य नाही. बाबरी कोसळली तसं त्यांचं धैर्य कोसळलं आणि आम्ही केलं हे नाही असं सांगितलं. दिल्लीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.





