breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला आजपासून सुरवात! तब्बल अडीच कोटी कुटुंबाचे होणार सर्वेक्षण

Maratha Reservation | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. १०० कुटुंबामागे एक प्रगणक यानुसार हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी सुमारे तब्बल सव्वा लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे १८१ प्रश्न असून या सर्वांची उत्तरे संबंधित कुटुंबाकडून भरून घेतली जाणार असल्याने प्रत्येक जिल्ह्यात जवळपास चार लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा    –    ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ 

त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याची वेळ प्रशासनाने दिली आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. तसेच आठ दिवस चालणाऱ्या या मोहिमेत सुमारे अडीच कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button