‘शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली नाही तर..’; संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ४० पक्षाचे आमदार आणि १० अपक्ष आमदारांसोबत केलेल्या बंडखोरीमुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावरून पाय उतार व्हावे लागले. ज्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत फुट पडली असं बोललं जात आहे. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे खोटं आहे. खरं म्हणजे हा पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी फोडला, हा भाजपाने फोडला आहे. हा त्यांनी घेतलेला सूड आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. एकनाथ शिंदेंमध्ये काहीच ताकद नव्हती. यांच्यावर केंद्रीय तपास संस्थाचा धाक निर्माण करण्यात आला.
हेही वाचा – Pune : आयएएस अधिकारी अनिल रामोड यांना CBI कडून अटक
एकनाथ शिंदे फारतर ७-८ लोक घेऊन जाऊ शकत होते. त्यांची क्षमता तेवढीच होती. बाकी आमदार केंद्रीय सत्तेचा दुरूपयोग, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था त्यांच्या टाचेखाली असल्याने गेले. लोकशाहीत असं होऊ नये, असंही संजय राऊत म्हणाले.





