breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune : आयएएस अधिकारी अनिल रामोड यांना CBI कडून अटक

पुणे : CBI ने शुक्रवारी पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड (IAS) यांना तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे. त्यांच्या घरी छापा टाकला असता पोलिसांना तब्बल ६ कोटी रूपयांची रोख रक्कम हाती लागली आहे. त्यांच्यावरील कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

हायवेलगतच्या एका जमिनीशी संबंधित हा व्यवहार होता. या कारवाईनंतर दुपारी सीबीआयने रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी पैसे मोजण्याचे मशीन मागवून घेतले आहे. रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शाहनिशा करुन सीबीआयने यांच्याभोवती सापळा लावला होता.

हेही वाचा – Ashadhi Wari : पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शाहनिशा करुन सीबीआयने रामोड यांच्याभोवती सापळा लावला होता. आज लाच स्वीकारताना अखेर सीबीआयने रामोड यांना अटक केली. रामोड हे मुळचे नांदेडचे असून मागील २ वर्षांपासून ते पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button