Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point: नव्या पर्वाचा शिलेदार.. जितेंद्र ननावरे होणार आमदार..!

शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या साथीने नगरसेवक ननावरेंची तयारी : 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘ब्रँडिंग’ सुरू

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी ‘‘नव्या पर्वाचा शिलेदार.. जितेंद्र ननावरे‘‘ हे प्रचारगीत प्रसिद्ध केले आहे. ‘सोशल मीडिया’वर या गीताची चर्चा रंगली आहे. तर, शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मदतीने आणि पाठिंब्याने ननावरे आता 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

पिंपरी विधानसभा क्षेत्रातील महापालिका प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनगर- फुलेनगर या परिसरातून नगरसेवक जितेंद्र ननावरे निवडून आले आहेत. त्यांचे राजकीय ‘‘गॉडफादर’’ शहराध्यक्ष योगेश बहल आहेत. प्रचंड अनुभवी असलेल्या बहल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आता हक्काचा माणूस मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीत या प्रभागातून बहल यांनी स्वत:सह पक्षाचे तीन नगरसेवक बहुमताने निवडून आणले आहेत आणि आपला बालेकिल्ला कायम ठेवला आहे.

विशेष म्हणजे, योगेश बहल ‘‘बोट दाखवतील तो नगरसेवक निवडून येतो..’’ असा राजकीय पॅटर्न या प्रभागात दिसून येतो. कारण, बहल यांचे ऐकेकाळचे समर्थक असलेल्या सुजाता पालांडे आणि सुलक्षणा शिलवंत-धर या त्यांच्या विरोधात गेल्यानंतर बहलांनी त्यांचा या महापालिका निवडणुकीत ‘‘करेक्ट कार्यक्रम’’ केला. सोबतच 2017 मध्ये पराभूत झालेल्या जितेंद्र ननावरे यांना पुन्हा संधी देत त्यांनी नगरसेवक केले.

राखीव मतदार संघावर ‘क्लेम’ करण्याची रणनिती…

दुसरीकडे, 2019 मध्ये सुलक्षणा शिलवंत-धर यांना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट ‘कन्फर्म’ होते. मात्र, बहल यांनी आपले ‘राजकीय वजन’ आमदार आण्णा बनसोडे यांच्या पारड्यात टाकले. त्यामुळे शिलवंत यांचा पत्ता कट झाला होता. 2024 मध्ये बहलांनी सुरवातीला बनसोडे यांना विरोध केला आणि भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या सीमा सावळे यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बनसोडे यांच्यावरच विश्वास ठेवला. त्यामुळे आता योगेश बहन पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी नवा चेहरा ‘लाँच’ करण्याच्या तयारीत आहेत. 2026-27 मध्ये मतदार संघ पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 5 मतदार संघ होतील. त्यापैकी अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असलेला मतदार संघ राखीव होणार आहे. राखीव मतदार संघातून जितेंद्र ननावरे यांना आमदारकीच्या उमेदवारीवर ‘क्लेम’ करण्यासाठी आतापासून रणनिती आखली जात आहे.

बस नामही काफी हैं..!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पातळीवरील “नव्या पर्वाचा शिलेदार… जितेंद्र ननावरे..” हे प्रचारगीत नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. या गीताच्या माध्यमातून ननावरे यांनी स्वतःची प्रतिमा एक नव्या नेतृत्वाच्या चेहऱ्याप्रमाणे उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. “बस नाम ही काफी है…” या घोषणेतून त्यांनी थेट जनतेशी भावनिक आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. योगेश बहल यांची साथ ननावरे यांच्यासाठी संघटनात्मक बळ ठरू शकते. शहराध्यक्ष म्हणून बहल यांचा पक्षातील प्रभाव आणि स्थानिक कार्यकर्त्यांवरील पकड लक्षात घेतल्यास, ही जोडी आगामी निवडणुकीत प्रभाव ठेवणार, असे चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button