शिवसेनेला सामनातील मोदींच्या जहिरातीवरून मनसेने डिवचले
![Sandeep Deshpande said that boxes should be called Sarkar and the match should be played on Sarkar's box](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/uddhav-thackeray-and-raj-thackeray-780x470.jpg)
खोके सरकार म्हणायचं आणि सरकारच्या खोक्यावर सामना चालवायचा
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची भलीमोठी जहिरात छापण्यात आली आहे. एकीकडे आज सामनाच्या अग्रलेखातुन मोदी सरकारला डिवचलं आहे, तर दुसरीकडे सामनामध्ये मोदींची जहिरात छापली आहे, त्यामुळे सामनातील जहिरात चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून आता मनसेने शिवसेना ठाकरे गटाला डिवचले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका ठिकाणी खोके सरकार म्हणायचं आणि सरकारनी दिलेल्या खोक्यावर सामना चालवायचा निर्लजम सदा सुखी!!, अशी टीका केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच पार्श्वभूमिवर आज दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पूर्णपणे भारतीय बनावटीतून तयार झालेली ही ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या मार्गावर धावणार आहे.