Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता”; बच्चू कडूंचे मोठे विधान

राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते

मुंबई : राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. येत्या १५ दिवसांत २० ते २५ आमदारांचा शिंदे गट-भाजपात प्रवेश होऊ शकतो, असा दावा बच्चू कडू यांनी आहे. कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतामध्ये आहे. म्हणजेच २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार कोर्टाकडून दिली जाणारी तारीख आणि आमदरांचा पक्षप्रवेश यामुळेच लांबतो आहे. दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येणार आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.

येत्या 15 दिवसांमध्ये 10-15 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. सरकार फक्त बहुमतात नाही तर अतिबहुमतात आहे. 20-25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण राहील. सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याचं कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे. 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदारच नाही राहिले, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button