Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘..तर फ्रिजमध्ये मृतदेहाचे ३५ तुकडे दिसतील’; स्वारा आणि फहाद यांच्या लग्नावरून साध्वी प्राचींची प्रतिक्रिया

मिडीयाला स्वरा व फहाद घटस्फोटाची बातमी मिळेल

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतेच काही दिवसांपुर्वी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे. तिच्या आंतरधर्मीय लग्नावरून तिला खूप ट्रोल केलं जात आहे. अशातच आता विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वरा याआधीही हिंदुविरोधी वक्तव्य करत होती. आता तिने फहाद अहमदशी लग्न करून ती हिंदुविरोधी असल्याचे सिद्ध केलं आहे. कदाचित तिला फ्रीज आणि सुटकेसमध्ये ठेवलेले श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे ३५ तुकडे दिसले नसावेत, असं साध्वी प्राचींनी म्हटलं आहे.

जर स्वराने श्रद्धाचे तुकडे पाहिले असते तर कदाचित तिने फहाद अहमदबरोबर लग्न केलं नसतं. स्वराबरोबर श्रद्धासारखी घटना केव्हाही होऊ शकते. तसेच मीडियाला स्वरा व फहाद घटस्फोटाची बातमी मिळेल, असं साध्वी प्राचीन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्वराने फाहादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भाऊ म्हटलं होतं. त्यावर साध्वी प्रांची यांनी प्रतिक्रिया देत अच्छा तो ये आपके भाई है, असा टोला लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button