छगन भुजबळांच्या ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचं उत्तर; म्हणाले..
![Rohit Pawar's reply to Chhagan Bhujbal's criticism](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Rohit-Pawar-and-Chhagan-Bhujbal-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची अंबड येथे आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली. यावेळी छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर टीकास्र सोडलं आहे. भुजबळांच्या या टीकेला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
रोहित पवार म्हणाले, छगन भुजबळ हे स्वत: मंत्री आहेत. मंत्री असताना त्यांना मंत्रीपदाचा योग्य वापर करता येत नसेल, या सरकारमध्ये मंत्र्यांचंच चालत नसेल, मंत्र्यांचंच ऐकलं जात नसेल, तर यावर आपण वेगळं काय बोलणार? राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा तर योग्य वेळ आल्यानंतर मी स्वत: यावर स्पष्टीकरण देईन.
हेही वाचा – आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, वाचा सविस्तर..
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
लाठीमार झाल्यानंतर हे शूर सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन झोपले होते. त्यांना आमचे अंबडचे मित्र राजेश टोपे आणि दुसरे आमचे मित्र रोहित पवार यांनी रात्री तीन वाजता घरातून उठवून आणलं आणि आंदोलन करण्यासाठी बसवलं. शरद पवार आंदोलनस्थळी येणार आहेत, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनाही तिथे आणलं, असं छगन भुजबळ म्हणाले.