breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, वाचा सविस्तर..

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हा पूल सुरु करण्यासंदर्भातील यापूर्वी अनेकवेळा डेडलाइन दिल्या होत्या. परंतु पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. हे काम रखडल्यामुळे गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले.

हेही वाचा – ओबीसी मेळाव्याचं निमंत्रण नव्हतं? पंकजा मुंडेंनी सांगितलं अनुपस्थित राहण्याचं कारण..

या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर लोअर परेल पुलाच उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पालिकेचे दोन अधिकारी एन एम जोशी पोलीस स्थानकात रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी दाखल झाले होते. रात्री तीन वाजेपर्यंत हे अधिकारी पोलीस ठाण्यात आले होते. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुलाचे काम अपूर्ण असताना बेकायदेशीपणे उद्घाटन कसे केले? आम्ही तीन, चार दिवसांत काम पूर्ण करुन ही मार्गिका सुरु करणार होतो, अशी भूमिका मुंबई मनपाने घेतली आहे.

आदित्य ठाकरे, सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरोधात एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button