‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला माझा विरोधच’; रामदास कदम यांचं विधान

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राभर आंदोलनाचा धडाका लावला आहे. दरम्यान, यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे.
रामदास कदम म्हणाले, एकाच वेळेला धनगर समाज, ओबीसी समाज, मराठा समाज रस्त्यावर कसा येतो याचा अर्थ आम्हाला कळत नाही असं नाही. काही लोकांचा मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यासाठी हेतुपुरस्कार हे कटकारस्थान सुरु असून त्याचा मी धिक्कार करतो.
हेही वाचा – नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का असतो? वाचा सविस्तर..
जरांगे पाटलांचा महाराष्ट्र आणि कोकणाचा तेवढा अभ्यास नाही. विदर्भात कुणबी मराठे चालतं, मात्र कोकणात चालत नाही, याची माहीती जरांगेना नाही. त्यामुळे भावनात्मक ब्लँकमेल करू नये. कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं रामदास कदम म्हणाले.
मी देखील मराठा आहे. मलाही वाटतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ही माझी देखील इच्छा आहे, पण मी कुणबी प्रमाणपत्र स्विकारण नाही. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कोणतेही मतभेद होता कामा नये. ओबीसींचं म्हणणं आहे की आमच्या आरक्षणाला हात न लावता त्यांना आरक्षण द्या. सरकार म्हणतं आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. जे लोकं आर्थिकदृष्ट्या खंबीर नाही, त्यांना आरक्षण देण्याची काम सरकार करत आहे, असंही रामदास कदम म्हणाले.





