breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणारे गप्प का? राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मणिपूर हिंसारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं आहे. केंद्र सरकारने याबाबत ठेस पावलं उचलावीत असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत मणिपूरमधील हिंसाचाराचे काही फोटो दाखवले आहेत. तसेच केंद्र सरकार आणि देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे यावर गप्प का? असा सवालही उपस्थित केला आहे.

व्हिडीओमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती या शोमध्ये एका ईशान्य भारतातील एका मुलीला कोहिमा शहक कोणत्या देशात आहे असा प्रश्न विचारतात. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चीन, नेपाळ आणि भारत असे तीन पर्याय देतात. तर ती मुलगी ऑडियन्स पोलचा पर्याय निवडते. यानंतर अमिताभ बच्चन पोलमध्ये १०० टक्के लोकांनी कोहिमा भारतात असल्याचं सांगतात. तसेच हे सर्वांना माहिती आहे असंही ते म्हणतात.

हेही वाचा – घरगुती बाप्पा शाडूचाच हवा! प्रशासनाकडून मूर्तिकार, विक्रेत्यांसाठी नियमावली जाहीर

https://twitter.com/RajThackeray/status/1675179864729747457

यानंतर ती मुलगी म्हणते, सर्वांना माहिती आहे, पण तसं मानायला किती जण तयार आहेत असा प्रश्न उपस्थित करते. यावर सर्वांच्या माना शरमेने खाली झुकतात. यानंतर या व्हिडीओत मणिपूरमधील हिंसाचारेचे काही फोटो दाखवण्यात आले आहेत. गेले दोन महिने ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दश: संतापाने धुमसतंय. केंद्र सरकार असो वा देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणारे तथाकथित देशभक्त यांनी मौन का बाळगलं आहे? असा सवाल या व्हिडीओमधून उपस्थित केला आहे. तसेच मणिपूरमधील हिंसाचार रोखा, तिथे शांतता प्रस्थापित करा, असं आवाहन यामधून करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button