Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

बेघरांना पालिकेच्या शेल्टरचा आसरा

पुणे :  पावसाळ्यात बेघर तसेच रात्री-अपरात्री शहरात आलेल्या नागरिकांना राहण्यासाठी महापालिकेने चार ठिकाणी रात्र निवारा प्रकल्प सुरू केले आहेत. पावसाळ्यात बेघरांना आश्रयाची आवश्यकता भासू शकते. अशा गरजू लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन समाज विकास विभागाने केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येस एक याप्रमाणे रात्र निवारा (नाइट शेल्टर) प्रकल्प उभारण्यात यावेत, असा निर्णय देण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त यांनी याबाबत मुख्य सचिव यांचेकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

हेही वाचा –  जीवघेणे पावसाळी पर्यटन बंद, कुठे काय लावले नियम, या पर्यटन स्थळावर रील अन् फोटो काढण्यास बंदी

त्यानुसार पुणे शहराची लोकसंख्या ३८ लाख गृहित धरून शासनाने पुणे शहरामध्ये ३८ ठिकाणी नाइट शेल्टर प्रकल्प राबविण्याबाबत कळवले आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरात केवळ ४ ठिकाणीच हे प्रकल्प सुरू आहेत. त्यांचा नियमित वापरही होत आहे. मात्र, शासनाने पावसाळ्यात बेघरांना रात्रीच्या वेळी राहण्यासाठी हे शेल्टर देण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यामुळे या प्रकल्पांचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी केले आहे. या चारही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून नियोजन पाहिले जाते.

येरवडा : मदर तेरेसा हॉल, गाडीतळ. येथे २६ पुरूषांच्या निवाऱ्याची सोय आहे.

नवी पेठ : सेनादत्त सांस्कृतिक हाॅल, सेनादत्त पोलीस चौकीमागे. येथे येथे २० स्त्री तसेच ४२ पुरुषांच्या निवासाची सोय आहे.

बोपोडी : केळभट्टी समाज मंदिरात २१ पुरुषांच्या राहण्याची सोय आहे.

पुणे स्टेशन : मोलोदिना वाहनतळ येथे स्त्रियांसाठी २२, तसेच पुरूषांसाठी २५ निवाऱ्याच्या जागेची सोय आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button