Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थकबाकी असलेल्या 88 मालमत्तांचा लिलाव

पिंपरी : मिळकतकर थकबाकी असलेल्या 88 मिळकती पिंपरी-चिंचवड महापालिकेने जप्त केल्या आहेत. त्यांचा लिलाव 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.

महापालिकेचा मिळकतकर वर्षानुवर्षे थकीत असलेल्या मिळकतधारकांना गेल्या वर्षी नोटीस बजावल्या होत्या. तरीही प्रतिसाद न दिल्याने मिळकती जप्त केल्या. त्यांचा आता लिलाव केला जाणार आहे. 50 हजारांपासून तीन लाख रुपयांपर्यंत मिळकतकर थकबाकी असलेल्या या मिळकती आहेत. त्यांचे बाजारमूल्य किमान 19 लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंत आहे.

हेही वाचा –  बेघरांना पालिकेच्या शेल्टरचा आसरा

यामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांसह व्यापारी व व्यावसायिकांच्या मालमत्तांचा समावेश आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील  तरतुदींनुसार मालमत्तांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी महापालिकेच्या करसंकलन विभाग, मुख्य कार्यालयात दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आधारकार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रतींसह लेखी अर्जाद्वारे नोंदणी करायची आहे. तसेच, लिलावातील मालमत्तांबाबत कोणत्याही व्यक्ती, संस्था व इतर यांचे आर्थिक हितसंबंध, हरकती असल्यास योग्य त्या कागदपत्रांसह तीन ऑगस्टपूर्वी लेखी स्वरूपात नोंदवायचे आहेत. महापालिका सहाय्यक आयुक्त (करआकारणी व करसंकलन) यांच्या कार्यालयात (तळमजला, महापालिका मुख्य इमारत, पिंपरी) 5 ऑगस्ट रोजी दपारी 12 ते 3 या वेळेत लिलाव प्रक्रिया होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button