Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘सध्या मला १० नापास झाल्यासारखंच वाटतंय’; राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

निवडणुका नेमक्या कधी लागणार? मार्च की ऑक्टोंबर?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं येत्या २२ मार्च रोजी पाडवा मेळाव्यात काय बोलणार याकडे संपुर्ण महाराषट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंचं एक विधान चांगलच चर्चेत आलं आहे. ते मुबंईत महाराष्ट्र शहीर या चित्रपटाच्या टीझर लाँच कार्यक्रमाला उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले की, २८ मार्चला महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण २८ तारखेला मी इथे नाहीये. मी बाहेरगावी जातोय. आम्ही सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखे आहोत. आमच्या निवडणुका नेमक्या कधी लागणार? मार्च की ऑक्टोंबर? असं सध्या चालू आहे. त्यामुळे बहुधा सध्या मला दहावी नापास झाल्यासारखंच वाटतंय. कधी ऑक्टोंबर? ऑक्टोंबर आल्यानंतर मग कधी? मार्च बहुधा. त्यामुळे आमचं सध्या दहावी नापास झाल्यासारखं चालू आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

निवडणूक नुसती येत नसते, ती वातावरणात असते. त्यामुळे सध्या निवडणूक मला वातावरणात काही दिसत नाहीये. त्यामुळे मध्ये थोडीळी गॅप मिळाली तर त्यात मी बाहेरगावी जाऊन येतोय. गेल्या ४-५ वर्षांपासून मी कुठेच बाहेरगावी गेलो नाही. त्यामुळे म्हटलं जरा बाहेरगावी जावं. नातू झालाय, त्यालाही बाहेर घेऊन जायचं होतं, असंही राज ठाकरे म्हाणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button