राहुल गांधी यांचा मुंबईतील बैठकीपुर्वी गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा! म्हणाले..
![Rahul Gandhi targets Gautam Adani and PM Modi ahead of meeting in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Rahul-Gandhi-2-780x470.jpg)
मुंबई : इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक पार पडणार आहे. यासाठी अनेक मोठे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी या देखील बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, जी २० च्या बैठकीसाठी वेगवेगळ्या देशाचे सदस्य येत आहेत. देशातल्या दोन प्रसिद्ध आर्थिक वृत्तपत्रात मोदी अदानी कुटुंबाशी संबंधित आहे. आपल्या शेअरमध्ये सिक्रेटली शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. या परिवाराने आपले पैसे गुंतवले, असं द गार्डियनमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या फायनान्शियल टाईम्स वृत्तपत्रातही म्हटलं आहे. १ मिलियन डॉलर भारतातून अदानींच्या कंपनींच्या नेटवर्ककडून वेगवेगळ्या देशात गेला आणि देशात आला. त्यातून अदानी यांनी आपले शेअर्सची किंमत वाढवली. त्याच किंमतीच्या फायद्यातून अदानी विमान, पोर्ट विकत घेत आहेत. त्यांना धारावीत मोठा प्रोजेक्ट मिळाले आहेत.
हेही वाचा – ‘शहरातील ‘नीचे दुकान ऊपर मकान’ पद्धत मोडीत काढा’; नाना काटे
#RahulGandhi Mumbai Live | राहुल गांधींचा मुंबईत पत्रकार परिषद https://t.co/nSNihYudd7
— Mahaenews (@mahae_news) August 31, 2023
अदानी यांना या पैशातून शेअर्सच्या किंमती फुगवून मिळवत आहे. हा पैसा जो वापरला जातोय तो कुणाचा आहे? अदानींचा आहे की दुसरा कुणाचा आहे? दुसरा कुणाचा आहे तो कुणाचा आहे? या कामाचे मास्टरमाईंट विनोद अदानी आहेत, जे गौतम अदानी यांचे भाऊ आहेत. एकाचं नाव नासर शबान आली आणि दुसार चिनी व्यक्ती आहे. अदानी भारतातले इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करत आहेत तर चिनी व्यक्तीचा संबंध काय? हे पैसे भारताच्या शेअर मार्केटवर कसा परिणाम करत आहे? विशेष म्हणजे चिनी व्यक्तीची भूमिका काय आहे? असं राहुल गांधी म्हणाले.
सेबीचा तपास झाला होता. ज्यांनी क्लिनचीट दिली, ज्या व्यक्तीने तपास केला, अदानींच्या चॅनलचे ते डिरेक्टर आहेत. याचाच अर्थ हे एक नेटवर्क आहे. सेबीचा चेअरमन क्लीनचीट देतो आणि नंतर अदानी यांच्या कंपनीत डायरेक्टर बनतो. आंतरराष्ट्रीय विषय आहे. या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का करत नाहीत? नरेंद्र मोदी आणि अदानी यांचं नातं आहे, असं वृत्तपत्र म्हणत आहेत. काय नातं आहे? ते त्यांनी जाहीर करावं. ईडी अदानी यांच्यावर रिसर्च का करत नाही? हा मोठा सवाल आहे. भारताच्या इभ्रतीचा विषय आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.