breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

शेख हसीना भारतात आहेत का? राहुल गांधींच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री म्हणाले..

नवी दिल्ली | बांगलादेशात अराजक माजल्याने शेख हसीना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत देशही सोडला आहे. त्या भारतात आल्या, भारतात त्या गाझियाबादमध्ये आल्या आणि अजित डोवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याचं वृत्त आहे. याबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी CCS ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींना बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, काही कळताच, त्यासंदर्भात माहिती कळवेन.

हेही वाचा     –      राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केली आरक्षणाबाबतची भूमिका; म्हणाले, ‘माझ्या हातात राज्य आलं तर..’

बांगलादेशात काय चाललं आहे? सरकारची भूमिका काय? शेख हसीना भारतात आल्या आहेत का? याशिवाय आणखी काही प्रश्न राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांना विचारले. यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जशी काही माहिती मिळेल, मी तुम्हाला नक्की सांगेन. बांगलादेशात गोंधळाचं आणि हिंसेचं वातावरण आहे. बांगलादेशात काय घडतं आहे त्याकडे भारत लक्ष ठेवून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button