Breaking-newsताज्या घडामोडी
आज श्रावणातील पहिले मंगळागौरी पूजन; जाणून घ्या महत्त्व आणि मुहूर्त..

Mangala Gauri Vrat | मंगळा गौरीचे व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील संकटे दूर होतात आणि इच्छित वराची प्राप्ती होते. आज ६ ऑगस्ट रोजी श्रावणातील पहिले मंगळा गौरी व्रत साजरे केले जाणार आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर पूजन केले जाते. नवविवाहीत महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे हे व्रत असते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते.
हेही वाचा – ‘बांगलादेशच्या माननीय पंतप्रधानांना भारतात सुरक्षित..’; कंगना रणौतची पोस्ट चर्चेत
मंगळा गौरी व्रत मुहूर्त :
- अभिजित मुहूर्त- दुपारी १२.०० ते दुपारी १२.४५ पर्यंत
- विजय मुहूर्त- दुपारी २.४१ ते दुपारी ३.३४ पर्यंत
- गोधुली मुहूर्त- संध्याकाळी ७.०८ ते ७.२९
- सायाह्य संध्या – ७.०८ ते ८.१२
- अमृत काळ- दुपारी ३.०६ ते दुपारी ४.५१ पर्यंत





