Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लाडकी बहीण योजनेचा पैसा आला कुठून? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

Prakash Ambedkar | राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची मदत दिली जात आहे. मात्र, या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, दुर्दैवाने सरकारला अदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नाही. आपले कंत्राटदार चालले पाहिजे यासाठी DBT बंद केली. बोगस आदिवासी भरती आहेत असे विधानसभात सांगितले. जे बोगस होते त्यांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले. पण आदिवासी पेसा अंतर्गत भरती केली नाही. लाडकी बहिण योजनेला कुठून पैसे आला? आदिवासीच्या बजेटचे ७ हजार कोटी लाडकी बहिण योजनेसाठी वर्ग केले का? जर असे नाही तर सरकारने आदिवासीच्या बजेटच्या विवरण द्यावे.

हेही वाचा    –    ‘निर्लज्ज राजकारण’, महाराष्ट्र सरकारवर अभिनेता शशांक केतकर भडकला; म्हणाला..

जे.पी. गावित म्हणाले, आमचे उपोषण २८ तारखेपर्यंत चालूच राहणार. येत्या २८ तारखेला राज्यातील सर्व आदिवासी पात्र उमेदवार नाशिक मध्ये येणार. २८ तारखेला मोठे आंदोलन करण्याची आम्ही भूमिका घेणार. २८ तारखेपर्यंत पेसा अंतर्गत भरती बाबत निर्णय नाही झाला तर मुख्यमंत्र्यांच्या दारातच जाऊनच बसा. प्रकाश आंबेडकर यांच्या ऑफर बाबत माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार. बाबासाहेबांनी सुद्धा सांगितले की, लढायचे असेल तर पोटात अन्न पाहिजे. महाविकास आघाडीचे काही लोक इथे येऊन पाठिंबा देऊन गेले, असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button