‘..तर शरद पवार पंतप्रधान झाले असते’; राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षांचा दावा
![Praful Patel said that Sharad Pawar would have become Prime Minister in 1996](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/sharad-pawar-3-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने होत असते. मात्र, शरद पवार यांनी आपल्याला पंतप्रधान होण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. ते एका प्रसिद्ध माध्यामांच्या मुलाखती दरम्यान बोलत होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवार यांनाही आहे. १९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसल्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला. तेव्हा काँग्रेस अंतर्गत जे वातावरण होतं. त्यामुळे १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते. तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते.
हेही वाचा – ‘गृहमंत्री साहेब राजीनामा द्या..’राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी
तेव्हा आम्ही कुठेही कमी पडलो. लोकसभा निवडणुकीनंतर ११ महिन्यानंतर केसरी यांनी देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली नव्हती. १४५ खासदार होते. तर, शरद पवार संसदीय नेते होते. देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, निवडणूक लागण्याची शक्यता होती, असंह प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या ११ महिन्यानंतर कोणत्या खासदाराला लगेच निवडणूक परवडणार होती? अचानक निवडणुकीला समोरे गेल्यावर खासदार आणि पक्ष निवडून येईल का? याबाबत साशंकता होती. सीताराम केसरी यांनी अचानक पाठिंबा काढून घेतला. कारण, केसरी यांना वाटलं होतं, ते स्वत: पंतप्रधान होतील, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.