‘गृहमंत्री साहेब राजीनामा द्या..’राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी

पुणे : काही दिवसांपासून राज्यात एका जाहिरातीमुळे राजकारण चांगलचा तापलं आहे. दरम्यान पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरमध्ये काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
काय आहे बॅनरमध्ये
महाराष्ट्र सुरक्षित आहे का?
इथे महिला सुरक्षित नाहीत…चालू लोकलमध्ये बलात्कार
इथे व्यापारी सुरक्षित नाहीत..रोज खंडणीखोर व कोयता गँग ची दहशत
इथं नेते सुरक्षित नाहीत..विरोधी पक्षातील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत
इथे पत्रकार सुरक्षित नाहीत..पत्रकारांना गाडीखाली चिरडलं जातं
इथे रोज जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. दंगली घडवण्याचा
प्रयत्न केला जातोय..तरीही कुठलीही ठोस कारवाई नाही
भ्रष्ठ अधिकाऱ्यांकडून रोज जनसामान्यांची फसवणूक होत आहे.

हेही वाचा – निगडी येथे महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण
राज्यात बलात्कार, कोयता गँगची दहशत, नेत्यांना जीवे मारण्याची धमकी, पत्रकारांना गाडीने चिरडणे, जाती धर्मात तेढ निर्माण करणे असे प्रकार रोज घडत आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सलचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप हूमे यांनी केला आहे.




