गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार अन् शरद पवारांचा फोटो
![Photo of Ajit Pawar and Sharad Pawar in Girish Mahajan's birthday advertisement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/ajit-pawar-1-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर स्वत अजित पवार यांनी या चर्चांना पुर्णविराम दिला. दरम्यान, आता भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत चक्क अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका दैनिकात शुभेच्छा देणारी जहिरात छापण्यात आली आहे. या जहिरातीवर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. सोबतच या जहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो छापण्यात आला आहे.
गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो छापण्यात आला आहे. तर अजित पवार यांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. अजित पवार यांच्या फोटो खाली ‘जिवा भावाचा माणूस’ असं कॅप्शन देखील टाकण्यात आलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/image-17-626x1024.png)
याच जहिरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ही जहिरात दिली आहे. त्यावर या बँकेचे चेअरमन संजय पवार यांचाही फोटो आहे. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांचाही फोटो आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या फोटो छापल्याने राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आलं आहे.