Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवडराजकारण

PCMC: प्रस्थापितांविरोधात विचारांची लढाई आम्ही जिंकणार! : शहराध्यक्ष तुषार कामठे

शहरातील फ्लेक्सनी लक्ष वेधले : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन उत्साहात

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पूर्ण क्षमतेने महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहे. प्रस्थापितांविरोधात ही विचारांची लढाई आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्याप्रमाणात फ्लेक्स उभारण्यात आले. तसेच, पुण्यातील कार्यक्रमाला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युवकांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नव्या दमाच्या युवकांना सोबत घेवून राष्ट्रवादी महापालिकेत विजयाची ‘तुतारी’ फुंकण्याच्या तयारीत आहे. 

दुसरीकडे, शहरात राष्ट्रवादी अजित पावर गटामध्ये सध्या वर्धापन दिनानिमित्त उदासीन वातावरण दिसले. वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीचे अपवादात्मक सोपस्कार करुन स्थानिक नेत्यांनी कार्यक्रम पार पाडला. शहराध्यक्ष योगेश बहल आणि त्यांच्या नेतृत्त्वातील स्थानिक कार्यकर्त्यांची फळीला अद्याप सूर गवसलेला दिसत नाही. 

तुषार कामठे यांची एकाकी झुंज…

2017 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आलेले माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपा आणि प्रस्थापितांविरोधात दंड थोपाटले. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी शहरात स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे रांग लावली होती. शहरातील तीनही मतदार संघात ‘तुतारी’च्या चिन्हावर उमेदवार देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. त्यानंतरही तुषार कामठे यांनी बलढ्य महायुतीविरोधात एकाकी झुंज कायम ठेवली आहे. अल्पावधीत कामठे यांनी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांचा विश्वास संपादन केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनेतील गट-तट बाजुला ठेवून एकजुटीने प्रयत्न केल्यास राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीसमोर आव्हान निर्माण करेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. 

हेही वाचा: Mission PCMC : रणसंग्राम होणार… चार सदस्यीय प्रभागपद्धतीवर शिक्कामोर्तब!

महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार की, स्वबळावर याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी किंबहुना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फौज आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आणि उदयोन्मुक उमेदवार महापालिका सभागृहामध्ये प्रतिनिधीत्व करतील. महायुती आणि भाजपामध्ये प्रस्थापितांचा भरणा आहे. पिंपरी-चिंचवडकर नागरिक प्रस्थापितांना नाकारतील.
तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट .

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button