Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

PCMC: आमदार महेशदादा लांडगे ‘‘मोठ्या भावासारखे’’ पाठिशी : महापौर रवि लांडगे

झारीतील शुक्राचाऱ्यांना चपराक : रवि लांडगे यांची ‘‘सोशल मीडिया पोस्ट व्हायरल’’

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । गावकी-भावकीच्या राजकारणाची झालर असलेल्या पिंपरी-चिंचवड-भोसरीमध्ये पुन्हा एकदा गावकी-भावकी सरस ठरली आहे. महापौरपदाच्या निवडीसाठी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांची ‘‘बिनविरोध’’ नियुक्ती होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कारण, त्यांच्याविरोधात एकही अर्ज भरलेला नाही.

विशेष म्हणजे, भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे आणि रवि लांडगे यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात ‘‘विस्तव जात नव्हता.’’ या निवडणुकीत प्रचंड स्पर्धा होती. त्यामुळे भाजपासह अन्य पक्षातील लांडगे विरोधकांचे चांगलेच फावले होते. पण, रवि लांडगे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने झारीतल्या शुक्राचाऱ्यांचा अक्षरश: भ्रमनिरास झाला आहे.

‘‘भाजपा महापालिका सत्ताकाळात रवि लांडगे यांना महत्त्वाचे पद दिले नाही..’’  असा दावा करीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपातून शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडीच्या जागावाटपात त्यांना संधी मिळाली नाही. महापालिका निवडणुकीपूर्वी आमदार महेश लांडगे यांनी भोसरीसह पंचक्रोशीतील गावकी-भावकीची एकजुट करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळाले आणि रवि लांडगे पुन्हा भाजपात स्वगृही परतले.

महापालिका निवडणुकीत तब्बल 84 जागा मिळवत भाजपाने पुन्हा सत्ता मिळवली. त्यानंतर महत्त्वाच्या पदांवर महेश लांडगे कुणाला संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. रवि लांडगे महापौरपदासाठी तीव्र इच्छुक होते. त्यामुळे महेश लांडगे त्यांना छुपा विरोध करतील किंवा संधी देणार नाहीत, असा दावा केला जात होता. किंबहुना, रवि लांडगेच महापौर होतील… अशी सोशल मीडियावर अटकळ बांधून ‘नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, महेश लांडगे यांनी ‘अनप्रेडिक्टेबल डिसिझन’ घेतला. पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन रवि लांडगे यांच्या नावावर एकमत करण्यात आले. त्यामुळे महेश लांडगेंसह गावकी-भावकीत ‘‘ दुहीची काडी टाकणारे’’ यांचा चांगलाच बंदोबस्त झाला आहे.

दरम्यान, महापौर रवि लांडगे यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट अत्यंत बोलकी आहे. किंबहुना, लांडगेंसह गावकी-भावकीत दरी निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा चांगलीच चपराक आहे. 

नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे आपल्पा पोस्टमध्ये म्हणातात की,
स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांनी भारतीय जनता पक्षासाठी केलेल्या त्याग, समर्पण आणि निस्वार्थ सेवाभावाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो महापौर पदावर कार्यरत असताना अखंड, प्रामाणिक व लोकाभिमुख सेवेच्या माध्यमातून सार्थ ठरवण्याचा संकल्प आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत आमदार महेशदादा लांडगे यांनी ‘‘मोठ्या भावासारखे’’ खंबीर पाठबळ दिले. “प्रत्येक टप्प्यावर मिळालेले त्यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि धैर्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जबाबदारीची जाणीव अधिक ठळक होते आणि सेवा अधिक अर्थपूर्ण वाटते.” स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या कार्याचा व विचारांचा भारतीय जनता पक्षाने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी पक्षाप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button