‘इंदिरा गांधी होणे इतके सोपे नाही !’; रोहिणी खडसेंची पोस्ट चर्चेत

Rohini Khadse : ऑपरेश सिंदूर नंतर भारत पाक सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. काल (दि.10) संध्याकाळी अधिकृतपण युद्धविराम जाहीर करण्यात आला. मात्र, अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने हा शब्द मोडत भारतावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्त केला. दरम्यान, शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सूचक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्यांचे ट्विट पाहता त्यांचा रोख नेमका कुणाकडे? असा सवाल राजकीय गोटात उपस्थित होत आहे.
पाकिस्तानने शुक्रवारी संध्याकाळपासून भारतासोबत शस्त्रसंधी करण्याचे मान्य केले होते. त्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला होता. परंतु, शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानकडून भारतावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला होता. यानंतर भारतीय लष्करालाही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते.
याचदरम्यान रोहिणी खडसे यांनी ‘इंदिरा गांधी होणे इतके सोपे नाही !’ अशा कॅप्शनसह त्यांनी ट्विट करत त्यांच्या निर्णयचाी आठवण करुन दिली आहे. 1971 मधील युद्धात स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या उपस्थिततीत पाकिस्तान भारताला शरण आल्लयाचे छायाचित्र पोस्ट केले आहे.
ज्यावेळी भारत पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेटकऱ्यांनी त्याची तुलना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या धैर्याबाबत आणि बांगलादेश निर्मितीविषयी चर्चा घडवून आणली होती.
अशातच रोहिणी खडसे यांच्या या पोस्टमुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्याचा हा सूचक इशारा कोणाला याबाबत कास लावले जात आहेत.