Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू; सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

मुंबई : गेल्या ७ दिवसांपासून सुरू असलेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सरकारी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची चर्चा झाल्यानंतर हा निर्णय समन्वयकांनी जाहीर केला.

राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. या आंदोलनात कोणतीही हिंसा नव्हती. हा संप त्या सगळ्यांनी यशस्वी करून दाखवला. मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती. शासनाने यासंदर्भात गेल्या सात दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली आहेत. आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलंय की याबाबत ते गंभीर विचार करत आहेत. यासंदर्भात सरकारनं समिती नेमली आहे. ती समीतीआधी आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक नाव प्रस्ताव सादर केला.

त्यानुसार प्रन्सिपल म्हणून जुन्या पेन्शन योजनेची संपकऱ्यांनी मागणी स्वीकारण्यात आली. जुनी आणि नवी पेन्शन योजना यात मोठं अंतर होतं. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात अंतर राहणार नाही अशी भूमिका शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात कळवली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ती निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल, अशी माहिती संपकरी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button