Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“जय भीम म्हणल्यामुळे विलासराव देशमुखांनी मंत्रीपद नाकारलं”, मतदानाच्या आधीच कॉंग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

मिशन विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसणार का? मतदार संघात चर्चा

लातूर | जय भीम म्हणाल्यामुळे तुम्हाला विलासराव देशमुख यांनी मंत्रिपद दिले नाही, असे कॉंग्रेसच्याच एका मंत्र्यांनी आपल्याला सांगितले असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. सध्या विलासराव देशमुख यांचे दोन सुपुत्र कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या विधानाचा त्यांना मोठा फटका बसणार का? अशीही चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

नितीन राऊत पुढे बोलतांना म्हणाले की, शपथविधीपूर्वी मला फोन करून तुमचे नाव मंत्रिमंडळात आहे, तयारीला लागा, असे सांगण्यात आले, मात्र शपथविधी होणार असतानाच तुमचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मी तीन महिने मंत्रालयात गेलो नाही. अखेर अनेक महिन्यांनी ज्या भागात मतदारांनी मला निवडून दिले आहे, त्या भागातील कामे मार्गी लावण्यासाठी मी मंत्रालय गाठले.

हेही वाचा    –      कामगार-कष्टकऱ्यांसोबत आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराची सांगता!

तेथे मला मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना भेटावे लागले. मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. मंत्री महोदय, मी सहाव्या महिन्यात मंत्रिमंडळाची बैठक चालू होती, त्यावेळी एकनाथराव राज्यमंत्री होते आणि त्यांनी माझा हात धरला आणि सांगितले की, नितीनभाऊ विलासरावांना भेटणार आहेत. “मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. “नितीन राऊत पुढे म्हणाले की, “मी म्हणालो सांगा – त्यानंतर ते इथे नाही म्हणाले आणि मला कोपऱ्यात घेऊन गेले आणि मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुख मोठ्याने जय भीम म्हणता, हे जय भीम म्हणणे बंद करा. कारण त्यांच्यामुळे तुमचे मंत्रीपद गेले. असेही ते म्हणाले.

त्यावर मी म्हणालो, जय भीम म्हटल्याने मला मंत्रिपद गमवावे लागले. यापेक्षा मोठा अभिमान कोणता असेल ते सांगा. नितीन राऊत उत्तर नागपुरातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे राजकीय पेच अधिकच वाढला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button