शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय मुलींची चमकदार कामगिरी

पिंपरी : दि.12 सप्टेंबर 2026 रोजी कावेरी नगर क्रीडा संकुल वाकड येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य,व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील मुलींनी 19 वर्ष वयोगटात विविध वजनी गटात 03 सुवर्णपदक, व 01 कांस्यपदक मिळवित उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे* निकाल-*19 वर्षाखालील मुली- 1) प्रथम क्रमांक – कु. प्राची वाघमोडे (-52 किलोग्रॅम) 2) प्रथम क्रमांक – कु. चैत्राली लांडगे (-70किलोग्रॅम), 2) प्रथम क्रमांक- कु. दीक्षा शेलार(-60किलोग्रॅम) 2) तृतीय क्रमांक – कु. दिव्या जगताप (-45किलोग्रॅम),

यातील प्रथम क्रमांक प्राप्त 03 खेळाडूं मुलींची जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक 22 ते 23 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या शालेय विभागस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. गतवर्षी देखील महाविद्यालयातील 04 वुशू खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून ते देदीप्यमान कामगिरी केली आहे. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
हेही वाचा – गोकुळ निवडणुकीत पुन्हा न्यायालयीन ट्विस्ट; ४९२ दूध संस्थांचा मतदानाचा हक्क सर्वोच्च न्यायालयात

या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर,पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रमदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.




