‘सरकारचा हस्तक्षेप ज्या प्रकल्पावर पडते तो प्रकल्प नष्ट होतो’; नितीन गडकरी यांचं विधान
![Nitin Gadkari said that the project on which the government's intervention falls, the project is destroyed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/nitin-gadkari-3-780x470.jpg)
मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, त्यांनी विविध प्रकल्पात होणाऱ्या सरकारच्या हस्तक्षेपावरून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
गॉड आणि गर्व्हनमेंटवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग किंवा सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते तो प्रकल्प नष्ट होतो, या थेअरीचा मी समर्थक आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. सरकारपासून जो दूर राहील तो प्रगती करू शकेल, असं सूचक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात पुढचे ४ ते ५ दिवस तुफान पावसाचा इशारा
दरम्यान, नितीन गडकरी यांना बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य सुत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला नागपुरात आणले आहे. त्याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.