पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ‘ती’ गोष्ट खुपते; नितीन गडकरी

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच मराठी अभिनेता अवधुत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि शरद पवार यांच्यातील खुपणारी गोष्ट काय हे सांगितलं आहे. त्यांचं हे उत्तर सध्या चांगलच चर्चेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुपणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला असता. नितीन गडकरी म्हणाले, ते स्वत: खूप काम करतात, परिश्रम करतात आणि सगळ्यांना काम करायला लावतात. त्यात लोक थकून जातात असं गडकरींनी म्हटलं आहे.
हेही वाचा – राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘गलिच्छ’ राजकारणाच्या निषेधार्थ पिंपरीत मनसेकडून ‘एक सही संतापा’ची मोहीम
अमित शाह यांची कोणती गोष्ट खुपते असं विचारलं असता ते म्हणाले, अमित शाह हे कायम गंभीर असतात. टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटतात. तर शरद पवार यांच्याविषयी खुपणारी गोष्ट काय असं विचारलं असता नितीन गडकरी म्हणाले की, शरद पवार हे स्पष्ट कधीच बोलत नाहीत ते आपल्याला खुपतं असं नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक इच्छा अपुर्ण राहिल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. त्यांनी पुढाकार घेतला होता. पण त्यात त्यांना यश आलं नाही. लिलावती रूग्णालयात उपचार घेत असताना बाळासाहेबांनी मलाही या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यास सांगितलं होतं, असंही नितीन गडकरी म्हणाले.





