Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘बी.एससी नर्सिंग’च्या जागा रिक्त राहू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू’; मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : “बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत प्रवेश मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. भारतीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या नियम व पात्रता निकषांनुसारच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहोचावी यासाठी व्यापक जनजागृती केली जात असून, जागा रिक्त राहू नये यासाठी शासन सर्व आवश्यक उपाययोजना करत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रालयात बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेत बदल करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई तसेच संबंधित अधिकारी आणि संस्था चालक, प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्राचे ‘एसटीपी मॉडेल’ देशासाठी रोल मॉडेल ठरणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यामध्ये जवळपास 300 बी.एससी. नर्सिंग महाविद्यालय सुरू असून मागील वर्षी जवळपास पाच हजार जागा बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या होत्या या पार्श्वभूमीवर राज्य सरकार बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेत बदल करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button