Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

लोकशाही नेतृत्वात मोदी आघाडीवर; जागतिक सर्वेक्षणाचा निष्कर्ष

नवी दिल्ली :  सन २०१४, २०१९ आणि २०२४ या सलग तीन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेते’ म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे.

ही माहिती ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या अमेरिकेतील नामवंत संशोधन संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणातून पुढे आली आहे. या सर्वेक्षणानुसार, तब्बल ७५ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. त्याचवेळी, १८ टक्के लोकांनी त्यांच्या कार्यशैलीला विरोध केला असून, उर्वरित सात टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. या यादीत पंतप्रधान मोदींनंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग दुसऱ्या स्थानी आहेत, तर अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेव्हिअर मिलेई तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा –  ‘वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

‘मॉर्निंग कन्सल्ट’ने विविध देशांतील नागरिकांची मते घेऊन ही यादी तयार केली आहे. यामध्ये राजकीय नेत्यांचे लोकप्रियतेचे प्रमाण, त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीवर नागरिकांचा विश्वास आणि त्यांच्या धोरणांवरील प्रतिक्रिया यांचा समावेश होता.

दरम्यान, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या सामाजिक माध्यमावर या सर्वेक्षणाचा तपशील शेअर करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “१०० कोटींपेक्षा अधिक भारतीयांचा विश्वास आणि जगभरातील लक्षावधी नागरिकांचा सन्मान यामुळे नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय व विश्वासार्ह लोकशाही नेते ठरले आहेत.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button