अजित पवार की शरद पवार कोणासोबत जाणार? नवाब मलिक म्हणाले..
![Nawab Malik said that I will not join any group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Nawab-Malik-1-780x470.jpg)
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी नवाब मलिकांची तुरूगांतून सुटका झाली आहे. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याबाबत स्वत प्रतिक्रिया दिली आहे.
नवाब मलिक म्हणाले, मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार आहे. गेल्या १८ महिन्यांच्या काळात माझ्या कुटुंबासह मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मूत्रपिंडाचा गंभीर आजारामुळे मलाही त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा – ‘आता छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही’; बच्चू कडूंचं विधान
सध्याच्या घडीला आरोग्याची काळजी घेणं, हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून मी उपचार घेणार आहे. पुढील महिनाभरात माझी प्रकृती सामान्य होईल, अशी मला आशा आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. याबाबतचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.