Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांच्या गटाला मिळाले नवं नाव, ‘या’ नावावर निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. यानंतर निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला आज तीन वाजेपर्यंत पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील एका नावावर निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलं आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत, अर्थात राज्यसभा निवडणुका पार पडेपर्यंत हे नाव वैध असेल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली होती. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला ऑनलाईन पद्धतीने पत्र पाठवलं होत. यामध्ये नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरद पवार, आणि नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी- एस अशी नावं पाठवण्यात आली होती. त्यातील नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नाव निवडणुक आयोगाने निश्चित केलं आहे.

हेही वाचा    –    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शरद पवारांची टीका; म्हणाले.. 

दरम्यान, राज्यात २७ तारखेला होऊ घातलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांसाठी निवडणुक आयोगाने ‘नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’, हे नाव शरद पवार गटाला दिले आहे. परंतु शरद पवार गटाकडून वटवृक्ष हे चिन्ह सुचवण्यात आल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button