शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सवाल
![Narendra Modi said what Sharad Pawar did for the farmers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/PM-Narendra-Modi--780x470.jpg)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिंर्डी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी काकडी गावातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या उपस्थित मोदींनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपले सरकार येण्याआधी महाराष्ट्रातील एक मोठे नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री कृषी मंत्री म्हणून काम करत होते. मी त्यांचा व्यक्तिगतरीत्या सन्मान करतो मात्र ७ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले. परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.
हेही वाचा – भारतात मोबाइल नंबर हा दहा आकडीच का वापरला जातो?
२०१४ पूर्वी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक महिने पैशांसाठी वाट पाहावी लागत होती. परंतु आमच्या सरकारने ही दलालशाही मोडीत काढली. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जात आहे. सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळत असल्यामुळे दलालीशाही संपली आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पाणी हे ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करा. पाण्याचा प्रत्येक थेंब वापरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा. आमच्या सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले दिले. त्यांना वेळेवर पैसा मिळावे, यासाठी साखर कारखान्यांना हजारो कोटींची मदत केली आहे. सहकार चळवळ अधिक मजबूत करण्याचे काम केले जात आहे. कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी सहकारी समित्यांना मदत दिली जात आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.