Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

… अन्ं महापाैर राहूल जाधव दुचाकीवरुन घराकडे रवाना

  • महापालिकेच्या सर्व विषय समित्यांसह सभापतीसह प्रभाग अध्यक्षांकडून वाहने जमा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापाैर, उपमहापाैर, सर्व विषय समित्यांचे सभापती, प्रभाग अध्यक्ष अशा सर्व पदाधि-यांनी आपली सरकारी वाहने जमा केली आहेत. दरम्यान, महापाैर राहूल जाधव यांनी महापालिकेचे वाहन जमा करुन त्यांनी दुचाकीवरुन घराकडे रवाना झाले आहेत. 

देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज (रविवारी) जाहीर झाल्या. तसेच आर्दश आचारसंहिता लागू  झाली. त्यामुळे सरकारी सोयी-सुविधांचा लाभ कोणत्याही लोकप्रतिनिंधीना घेता येत नाही. त्यानूसार सरकारी वाहने देखील कार्यालय ठिकाणी जमा करावी लागतात. त्यानूसार महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापती, प्रभाग अध्यक्षांकडील वाहने जमा करण्यात आली आहेत. तसेच आचारसंहिता संपेपर्यंत पदाधिका-यांच्या सरकारी वाहन वापरता येत नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button