Prime Minister of Bharat : नरेंद्र मोदी इंडियाचे नव्हे भारताचे पंतप्रधान; भाजप नेत्याचं ट्वीट व्हायरल
![Narendra Modi Prime Minister of India not India; BJP leader's tweet goes viral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/narendra-modi-1-780x470.jpg)
Prime Minister of Bharat : दिल्लीमध्ये जी-२० समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केलं आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या बदलामुळे राजकीय वाद पेटला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज इंडोनेशियाला जाणार आहेत. पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘प्राईम मिनिस्टर ऑफ भारत’ असा करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी प्रश्न का नाही सोडवला? उदयनराजेंचा सवाल
‘The Prime Minister Of Bharat’ pic.twitter.com/lHozUHSoC4
— Sambit Patra (@sambitswaraj) September 5, 2023
ASEAN-India सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. ASEAN चं अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. भारत, अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश या संघटनेत सहभागी आहोत.