“आमच्या नादी लागू नका पुण्यात येऊन बारा वाजवेन”; नारायण राणेंचा पवारांना इशारा
![Narayan Rane said that don't apply to our nadi, he will come to Pune and play twelve](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ajit-pawar-and-Narayan-rane-780x470.jpg)
बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. यानंतर आता नारायण राणेंनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार आमच्या नादी लागू नका पुण्यात येऊन बारा वाजवेन, असा इशारा राणेंनी दिला आहे.
नारायण राणे म्हणाले की, बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही. मात्र त्यांनी माझ्या नादाला लागू नये नाही तर बारामतीत येऊन मी बारा वाजवणार, असा इशारा नारायण राणेंनी अजित पवारांना दिला आहे.
ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरूष असेन उमेदवार हा उमेदवार असतो, असं नारायण राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहिलं आहे? कुठलंही अस्तित्व नाही, काही नाही. गेलेले लोक काय म्हणतात आपल्याबद्दल ते पहा. अडीच वर्षात आपण काय केलं ते पहा म्हणाव, असं राणे म्हणाले.