‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजप लढवणार’; नारायण राणेंचं ट्वीट चर्चेत
![Narayan Rane said that BJP will contest Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha seat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Narayan-Rane-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीमधील मित्रपक्षांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एका ट्वीटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ नागरिकांना आता घरबसल्या मतदान करता येणार!
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 29, 2024
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे खासदार आहेत. ते गेल्या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये या मतदारसंघांमधून निवडून येत आहेत. भाजपने राज्यसभेची संधी दिली. पण आता त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेची संधी दिलेली नाही. त्यामुळे नारायण राणे यांना लोकसभेची संधी दिली जाईल. ते लोकसभा निवडणूक लढवणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे.