breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजितदादा यांनी सरड्यासारखा रंग बदलला’; नाना पटोलेंची खोचक टीका

मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर विरोधी पक्षाकडून अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अजितदादा यांनी सरड्यासारखा रंग बदलला, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

नाना पटोले म्हणाले की, इगतपुरीत एका गरोदर मातेचा मृत्यू झाला. या घटनेचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. अधिवेशन सुरू आहे. पुरवण्या मागण्या झाल्या आहेत. आदिवासी भागात रस्ते नाहीत त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत आम्ही काँग्रेसने सभागृहात विषय मांडला. पुरवण्या मान्य केल्या, पण एवढा पैसा आणणार कुठून? असा सवाल आम्ही केला. ज्यांच्याकडून पैसे घेता त्यामध्ये आदिवासी देखील आहेत. पण आदिवासी लोकांना सोयी सुविधा काय देताय? भाजप केवळ मूठभर लोकांना सोयी सुविधा देताहेत. सत्तेचा माज जो भाजपला आला आहे. हा माज लोक उतरवणार.

हेही वाचा – ICC ची मोठी कारवाई! हरमनप्रीत कौरवर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी 

सरडा हा रंग बदलतो. काल अजित पवार यांनी सरड्यासारखा रंग बदलला. मी त्यांना सरडा म्हणत नाही पण त्यांच्यामध्ये माणसाचा धर्म दिसत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी अजितदादा यांच्यावर केली. हे सरकार घोषणेचा पाऊस पाडणारं सरकार आहे. या सरकारला आमचं आव्हान आहे की घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारमुळे होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हे भाजप सरकार जबाबदार आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button