Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा

पुणे : राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्ली विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे. १३ जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवलं होतं.

माध्यमानुसार मिळालेल्या माहितीनुसार, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले.

हेही वाचा – ‘अजितदादा यांनी सरड्यासारखा रंग बदलला’; नाना पटोलेंची खोचक टीका

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा मुलगा देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. समरीया यांना तीन वर्षाच्या तुरूगवासांची शिक्षा सुनावली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button