खासदार संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळेवर टीका
औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष होतील असा पालटवर बावनकुळे यांनी केला

मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खिशात आणि बेडरूममध्ये औरंगजेबाचा फोटो असेल अशी टीका आज शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यावर आता बावनकुळे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष होतील असा पालटवर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे राऊत आणि बावनकुळे यांच्यात आता वार पलटवार सुरू झालेले बघायला मिळत आहेत.
हेही वाचा – ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटींची तरतूद’; उपमुख्यमंत्री अजित पवार
हिंदुत्वाचा विचार सोडला, भगव्या ध्वजाचा विचार सोडला, म्हणून मी असं म्हंटलं होतं की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅनक्लबचे मेंबर झाले आहेत. आता एखाद्यावेळी ते अध्यक्ष होतील पुढच्या काळात. संजय राऊत यांचं मला काही ऐकु येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकायचं सोडलं आहे, असा पालटवर आता बावनकुळे यांनी केला आहे.