‘९ टक्के हिंदू एकत्र आले तरीही रामराज्य स्थापन होईल’; मिथुन चक्रवर्तींचं वक्तव्य

Mithun Chakraborty | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालच्या हिंदू मतदारांसाठी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यात ९ टक्के हिंदू एकत्र आले तरीही रामराज्य स्थापन होईल हे कुणी विसरु नये, असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले, की बांगलादेशात जे घडलं आहे त्यावरुन आपण धडा घेतला पाहिजे. आपण जर जिंकलो नाही तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू बंगाली वाचणार नाहीत. भाजपा समर्थक हिंदू बंगाली सुरक्षित राहणार नाहीत. जर पुन्हा आहे तेच लोक सत्तेत आले तर ते आपल्याला सोडणार नाहीत.
हेही वाचा : एकही नारा..एकही नाम..जय श्रीराम: पिंपरी-चिंचवडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अतिभव्य शोभायात्रा!
आपण जिंकलं पाहिजे, त्याचं कारण बांगलादेशातील परिस्थिती. व्यक्तिगत विचारधारा, पसंती-नापसंती सगळं काही बाजूला ठेवा आणि भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्या. आधी हे लक्षात घ्या की आपल्याला निवडणूक जिंकायची आहे. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. हेच धोरण आपल्याकडे फायदेशीर ठरणार आहे, असंही मिथुन यांनी म्हटलं आहे.