ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिर, पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा

– समाजसेवेच्या कार्याची दखल; ॲड. एस. बी. चांडक यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहीर..!

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे दिवंगत माजी महापौर कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी, दि. ६ जून २०२६ रोजी नवमहाराष्ट्र मैदान, पिंपरी वाघेरे येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ पिंपरी वाघेरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात रक्तदान शिबिर, पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा तसेच स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहे. अशी माहिती कै. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुदाम नाणेकर, हभप जावळे महाराज, बाळा महाराज वाघेरे, अंकुश वाघेरे, जयनाथ शिंदे, अण्णा कापसे, रमेश गोलांडे उपस्थित होते.

कै. भिकू वाघेरे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत जनतेसाठी कार्य केले. पिंपरी-चिंचवडच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा आणि समाजसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा त्यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला विशेष स्वरूप देण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत कै. भिकू वाघेरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने होणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार असून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार आहे. रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमातून गरजू रुग्णांना मदत मिळावी, या हेतूने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हेही वाचा –  राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषाताई वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, पिंपरी चिंचवड शहर युवासेना प्रमुख चेतन पवार, नरहरी कापसे, नगरसेविका उषा उर्फ माई काटे, माजी नगरसेवक हनुमंतराव नेवाळे, माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा सुमनताई पवळे, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, उद्योजक दिलीपराव देवकर, म्हातोबा देवस्थानचे खजिनदार यशवंत साखरे, उद्योजक विजय काटे, शिवाजी वाघेरे, दत्तात्रय मासुळकर, फजल शेख, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब (आप्पा) वाघेरे, पवना सहकारी बँकेचे संचालक बिपीन नानेकर, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, नाणीक उर्फ नरेश पंजाबी, सुवर्णा परदेशी, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, अनिता वाळुंजकर, नव महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य अजय कापरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित राहणार आहेत.

कै. भिकू वाघेरे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम हा केवळ अभिवादनाचा नसून समाजहिताच्या कार्याला चालना देणारा उपक्रम ठरणार आहे. कै. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होऊन समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.

स्मृतिदिनाच्या निमित्ताने कै. भिकू वाघेरे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि समाजसेवेच्या वारशाचा जागर करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button